मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू हवामान विभागाची मोठी घोषणा

मान्सूनचा परतीचा प्रवास सूरू
मान्सूनचा परतीचा प्रवास सूरू


मित्रांनो आजच्या नवीन आर्टीकल मध्ये आपले स्वागत आहे.

मान्सूनचा परतीचा प्रवास सूरू

 यावर्षी पाऊस कुठे कमी तर कुठे जास्त झालेला आहे आपल्या देशातील प्रत्येक जण दरवर्षी पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो पावसाचा आनंद घेणे कोणाला आवडत नाही पावसाच्या सरी कोसळत असतानाचे मनमोहक दृश्य मन प्रसन्न करून जाते आणि त्यातच आपला देश कृषिप्रधान देश आहे बहुतांश लोक शेतीवर अवलंबून आहेत तसेच जीवनावश्यक वस्तू व उदरनिर्वाहासाठी आपल्याला पावसाची अत्याधिक गरज असते त्यामुळे प्रत्येक जण मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतो व मान्सून आल्यानंतर मान्सूनचे सुखद विलक्षण क्षण अनुभवत असतो तर देशातील शेतकरी बी बियाणे खते खरेदी करून शेतीच्या कामाला सुरुवात करतो अशा प्रकारे प्रत्येक जण मान्सूनच्या आगमनाने आनंदित होतो यावर्षी नेहमीप्रमाणे जूनमध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे कुठे कमी तर कुठे जास्त पाऊस पडला आहे व आता 25 सप्टेंबर पासून मान्सूनने निरोप घेण्यास सुरुवात केली आहे तशी घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे.


कसे होते मान्सूनचे आगमन आणी परतीचा प्रवास

यावर्षीचा मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे आज पासून 25 सप्टेंबर पासून मान्सूनचा परतीचा परवा सुरू झाला आहे यापूर्वी हवामान विभागाने भाकीत केले होते की मान्सूनचा परतीचा प्रवास 25 सप्टेंबर पासून सुरू होऊ शकतो ते भाकित खरे ठरले असून मान्सूनचा परतीचा प्रवास 25 सप्टेंबर पासून सुरू झालेला आहे भारताच्या वायव्य राजस्थान मधून मान्सून माघारी फिरला आहे तशी घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे 
कसे होते मान्सूनचे आगमन आणि परतीचा प्रवास
आपल्या भारत देशामध्ये मान्सून सर्वसाधारणपणे दरवर्षी एक जून पर्यंत केरळमध्ये दाखल होतो त्यानंतर आठ जुलैपर्यंत संपूर्ण देशामध्ये मान्सून पसरतो आठ जुलै पर्यंत संपूर्ण देश मान्सून ने व्यापल्यानंतर सर्वसाधारणपणे 17 सप्टेंबर पासून राजस्थानच्या वायव्य भागातून पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते व जवळपास एक महिन्यापर्यंत म्हणजे 15 ऑक्टोबर पर्यंत मान्सूनचा हा परतीचा प्रवास चालू असतो यावर्षी मात्र मान्सूनचा परतीचा प्रवास उशिराने सुरू झालेला आहे साधारणपणे 17 सप्टेंबर पासून माघारी फिरणारा मान्सून यावर्षी 25 सप्टेंबर पासून माघारी परतण्यास सुरुवात झाली आहे काही दिवसापूर्वी हवामान विभागाने सांगितले होते की 25 सप्टेंबर पर्यंत मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे ती शक्यता आता खरी ठरली असून 25 सप्टेंबर पासून वायव्य राजस्थान मधून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे.
 आज हवामान विभागाने त्याबाबतची घोषणा केली आहे

 हवामान विभागाची मोठी घोषणा

यावर्षी महाराष्ट्रात जेमतेम पाऊस झाला आहे मराठवाड्यात कमी पाऊस झाला आहे संपूर्ण देशाचा विचार करता कुठे जास्त तर कुठे कमी पाऊस झालेला आहे देशाच्या विविध भागांमध्ये कमी जास्त पावसाचे प्रमाण अशी परिस्थिती असताना आता मान्सून देशातून माघारी फिरण्यास सुरुवात झाली आहे तसे वातावरण राजस्थानमध्ये निर्माण झालेले आहे कारण मागील पाच दिवसापासून वायव्य राजस्थानमध्ये पाऊस नाही तसेच वायव्य राजस्थानमध्ये कोरडे वातावरण निर्माण झालेले आहे त्यामुळे ही सर्व वास्तविक परिस्थिती व वातावरण बघता देशातून मान्सून माघारी फिरत असल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे.
तर मित्रांनो ही होती आजची महत्त्वाची बातमी.
mansun cha particha pravas suru
 ही बातमी आपण इतर लोकांसोबत नक्की शेअर करा आजचा लेख शेवट पर्यंत आवर्जून वाचल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद .

Post a Comment

0 Comments